Ratnagiri : भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये संधी; इच्छुक उमेदवारांची १६ सप्टेंबरला मुलाखत

रत्नागिरी : भारतीय सशस्त्र सैन्यदलांमध्ये अधिकारी पदाचा पूर्वप्रशिक्षण एसएसबी कोर्स सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी येथील जिल्हा सैनिक कार्यालयात दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 08/Sep/2025