Ratnagiri : हमीभाव मिळवण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे आवश्यक

रत्नागिरी : शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासन दप्तरी व्हावी व शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ई-पीक पाहणी महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील भात पिकासाठी शासनाकडून हमीभाव देण्यात येतो. त्यामुळे हमीभाव मिळवण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.

दी मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भाताची खरेदी करण्यात येते. शासनाकडून भातासाठी दरवर्षी हमीभाव निश्चित करता येतो. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली असेल त्याच शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करून भात विक्री करता येणार आहे. त्यामुळे भात विक्रीसाठी हमीभाव अत्यंत आवश्यक आहे.

काय आहे ई-पीक पाहणी?
शेतकऱ्यांना त्याच्या शेतातील पिकाची माहिती स्वतः मोबाइल अॅपद्वारे डिजिटल स्वरूपात नोंदविण्याची सुविधा म्हणजेच ई-पीक पाहणी असून, पारदर्शी, सुलभप्रक्रिया आहे.

कोणती पिके योजनेत ?
जिल्ह्यातील एकमेव भात पिकासाठी शासनाकडून हमीभाव देण्यात येत असल्यामुळे भात पिकाची ई पीक पाहणी करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

थेट बँक खात्यात रक्कम
नोंदणीकृत शेतकऱ्यांनी विक्री केंद्रावर भात विक्री केल्यानंतर विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होतात त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करताना बँक खाते तपशील देणे आवश्यक आहे.

ई-पीक पाहणी का आवश्यक आहे?
शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासन दप्तरी व्हावी व शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी, ई-पाहणी कशी करायची ?
गुगल प्ले स्टोअरवरून DCS अॅप डाउनलोड करून अॅपमध्ये लॉगीन करून पिकाची नोंदणी करावी व पिकाचा फोटोही अपलोड करावा.

खरेदी प्रक्रिया कशी असेल?
शासनाकडून विक्री केंद्र निश्चित करून तेथे विक्रीची व्यवस्था करण्यात येते. तत्पूर्वी, शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. त्यासाठी शासनाकडून नोंदणी प्रक्रियेसाठी सूचना केली जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 08/Sep/2025