संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी घडलेल्या घटनेनं उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले. संगमेश्वर एसटी स्टॅण्डपासून अवघ्या काही मीटर अंतरावर वाहनाच्या धडकेत एका गाईच्या वासराचा मृत्यू झाला. काही महिन्यांचा असलेले ते वासरू जागीच कोसळून प्राण सोडून गेले.
मात्र यानंतरचे दृश्य अधिकच हृदयद्रावक ठरले. मृत वासराच्या आईनं त्याच्या भोवती फेर धरला, त्याला चाटलं, हालचाल न झाल्याने हंबरडा फोडला. कळपातील इतर जनावरंही पुढे सरकली नाहीत, तर मृत वासराच्या शेजारीच ठाण मांडून बसली. हे भावनिक दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले.
महामार्गावरील मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर
संगमेश्वर शहरात आणि महामार्गावर मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. पादचाऱ्यांसह वाहनधारकांनाही या जनावरांमुळे धोका निर्माण होतो. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात अचानक गाय वा वासरू समोर आल्याने अपघात घडतात. यामध्ये मुक्या जनावरांचा नाहक बळी जातो.
काही दिवसांपूर्वीही शहरातील रस्त्यावर चारचाकीच्या धडकेत एका वासराचा मृत्यू झाला होता. तर महामार्गावरील अपघातात एक बैल ठार झाला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती सुरू असून, आता जनावरांच्या जीवित-मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 08/Sep/2025












