Dapoli : दापोली उपजिल्हा रुग्णालयासमोर बैलांची झुंज

दापोली : दापोली उपजिल्हा रुग्णालयासमोर दोन बैलांची झालेली झुंज यातून बघणाऱ्यांचे मनोरंजन झाले असले तरी या झुंजीमुळे या ठिकाणी काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. शहरात रोजच अशा बैलांच्या झुंजी होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर शहरात उनाड जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

या उनाड जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अनेक वेळा ही जनावरे झुंडीने रहदारीच्या मार्गावर बसलेली असतात त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 09/Sep/2025