Guhagar : गुहागरमध्ये आज आमसभेचे आयोजन

गुहागर : गुहागर पंचायत समिती आमसभा ९ सप्टेंबर रोजी पाटपन्हाळे येथील पूजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. आमसभेसाठी आत्तापर्यंत पंचायत समितीमध्ये २८ अर्ज दाखल झाले आहेत. आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या आमसभेत विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

यामध्ये १० अर्ज महावितरणसाठी आहेत. यात वीज खांब, वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर बदलणे तसेच स्मार्ट मीटरसाठी विरोधी असल्याचे अर्ज दाखल झाले आहेत, तर ५ अर्ज जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्यासाठी दाखल झाले आहेत. या अर्जामध्ये सर्वाधिक दुरुस्ती, डांबरीकरण, संरक्षक भिंती यांचीच मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागावर ४ अर्ज दाखल आहेत. यामध्ये संरक्षक भिंत, कोंडकारुळ बोऱ्या फाट्या ते कारूळ रस्त्याला पडलेले खड्ड रस्ता डांबरीकरण आदी अर्ज आहेत. कोकण एलएनजी कंपनीच्या नाप्ता गॅस पदार्थाच्या सुरक्षिततेबाबत अर्ज केलेला आहे. तालुका कृषी विभागाकडे फळ बाग योजना, भात बियाणे पुरवलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 09/Sep/2025