Sagameshwar : संगमेश्वर येथून बेपत्ता तरुणीचा देऊडमध्ये सापडला मृतदेह

संगमेश्वर : देऊडमध्ये सापडला युवतीचा मृतदेह रत्नागिरी संगमेश्वर येथून बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह रत्नागिरीतील देऊड खाडीत आढळून आला. ही घटना सोमवारी (ता. ८) सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आली. मानसी मंगेश भायजे (वय १५, रा. धामापूर तर्फे संगमेश्वर) असे या तरुणीचे नाव आहे.

मानसी ही ३१ ऑगस्टला संगमेश्वर येथील राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या नातेवाइकांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात माहिती दिली होती. माहितीवरून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. सोमवारी सकाळी तिचा मृतदेह देऊड खाडीत आढळला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 09/Sep/2025