चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव स्वरुपाची ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ ‘राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींना लेखनासाठी वा. सी. मर्ढेकर यांच्या ‘गणपत वाणी’ या कवितेतील पहिलीच ओळ गणपत वाणी बिडी पिताना देण्यात आली आहे.
काव्यलेखक स्पर्धकाने कवितेच्या सुरुवातीला ही ओळ वापरणे अधिक कसदार मानण्यात येईल. प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, द्वितीय ३ हजार रू., तृतीय २ हजार रू. तसेच प्रत्येकी १ हजार रूपयांची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभाग नोंदवण्यासाठी आपली कविता मोबाईलवर मराठी भाषेत टाईप करून आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि संपूर्ण परिचयासह पाठवावी.
निवडक उत्तम कवितांचा संग्रह पुणे येथील प्रतिथयश प्रकाशन संस्थेतर्फे छापण्याचा मानस आहे. कविता २६ ऑक्टोबरपर्यंत धीरज वाटेकर, दीपक मोने, प्राची जोशी यांच्याकडे पाठवण्याचे आवाहन मसाप शाखा अध्यक्ष संतोष गोनबरे, कोमसाप शाखाध्यक्ष अरुण इंगवले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 09/Sep/2025













