रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येणार आहे.
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी लाखो रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. अभियानामुळे ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचे बक्षीस मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा कालावधी हा १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 09/Sep/2025













