Chiplun : दुकानात खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; तरुणावर गुन्हा

चिपळूण : दुकानात खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग केल्याची घटना जिल्ह्यात रविवारी (ता. ७) सायंकाळी घडली. याप्रकरणी तरुणावर पोक्सोअंतर्गत सोमवारी गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अयान सकवारे (वय २३) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. पीडिता जिल्ह्यातील एका गावातील नातेवाइकांकडे राहते.

रविवारी (ता. ७) ती दुकानात खरेदीसाठी गेली असता अयान याने तिला थांबवून तिच्याशी वाद घातला. त्यानंतर तेथून त्या तरुणीने पळ काढला. मात्र, त्याने तिचा पाठलाग करून तिच्या गैरवर्तन केले. त्यामुळे पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अयान सकवारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 09/Sep/2025