Sangameshwar : बांधाच्या आडोशाला होणाऱ्या विदेशी मद्य विक्रीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरी : देवरूख ते मार्लेश्वर (ता. संगमेश्वर) येथील एका बांधाच्या आडोशाला होणाऱ्या विदेशी मद्य विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश लक्ष्मण पोवार (वय ३८, रा. गोठणे पुर्नवसन, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ७) रात्री आठच्या सुमारास देवरुख ते मार्लेश्वर जाणाऱ्या रस्त्यालगत एका चिऱ्याचे बांधाच्या आडोशाला निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना विदेशी मद्य विक्री करत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी रविवारी कारवाई केली. या कारवाईत संशयिताकडे ४ हजार २९० रुपयांच्या विविध विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अभिषेक वेलवणकर यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी मद्य विक्री करणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 09/Sep/2025