Ratnagiri : नारळाने गाठली पन्नाशी !

रत्नागिरी : गणेशोत्सवात नारळाची मागणी वाढली असली तरी, उत्पादनात घट असल्यामुळे दरात तेजी आहे. किरकोळ दरात वाढ होऊन नारळाने पन्नाशी गाठली. छोटे नारळ ३५ रुपयांना मिळत आहेत. नारळाचे दर वाढल्याने गोटा खोबरे आणि खोबरेल तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत नारळ, सुके खोबरे आणि खोबरेल तेलाच्या दरात तेजीच राहणार असल्याचे संकेत नारळ व्यापाऱ्यांनी दिले आहेत. कोकणात जरी नारळाचे उत्पन्न घेत जात असले तरी माकडांमुळे शेतकरी हैराण झाले आहे.

गतवर्षापेक्षा नारळाची मागणी यंदा दुप्पट झाली. आजपर्यंत नारळाची आयात करण्याची वेळ कधीच आली नव्हती. दरात तेजी राहिली, तर बाहेरून नारळ आयात करण्याशिवाय पर्याय नाही, असे नारळाचे घाऊक व्यापारी यांनी सांगितले. कर्नाटकातील कित्तूर आणि तमिळनाडूतून नारळाची खरेदी सर्व राज्ये करतात. अवेळी पडणारा प्रचंड पाऊस आणि हवामानाचा परिणाम बदलत्या नारळाच्या
उत्पादनावर होत आहे. सततच्या पावसामुळे नारळ काढण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा होऊ शकत नाही. कोकणात सुद्धा नारळाचे उत्पादन घेतले जाते. परंतू सध्या माकडांनी हैराण केले आहे.

कुशल कामगारांची कमतरता
कोकणात नारळ उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असले तरी माकडांच्या उपद्रवातून नारळ सुटले तर ते काढण्यासाठी कुशल कामगारांची कमतरता जाणवते. कोकणात नारळ बोर्ड स्थापन झाले आहे. परंतू ते कागदावरच राहिलेले दिसत आहे.

सण, विवाह, हॉटेलसाठी मागणीत वाढ
श्रावणापासून सण, समारंभ, विवाह, हॉटेलमधून मागणी वाढल्याने नारळाच्या दरात तेजी आहे. श्रावण, गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात रक्षाबंधनासाठी, गुजरातमध्ये, तर इतर राज्यांत दसरा, दिवाळीत नारळाला मागणी अधिक असते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 09/Sep/2025