khed : आय.सी.एस. महाविद्यालयात एड्स, गुप्तरोग व व्यसनाधीनता विषयावर मार्गदर्शन

खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या रेड रिबन क्लब अंतर्गत एड्स, गुप्तरोग व व्यसनाधीनता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर मार्गदर्शन करण्यासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक श्री.व्ही.एन. मस्के आणि रुग्णालयाच्या परिचारिका सौ. महाडिक उपस्थित होत्या. श्री. मस्के यांनी एड्स आणि गुप्तरोग या विषयावर मार्गदर्शन केले. तर सौ. महाडिक यांनी व्यसनाधीनता या विषयावर मुलांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रो. डॉ. विद्या शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एम. के. केळकर तसेच एस. व्ही. म्हस्के, प्रा. सुप्रिया कडगे, वाणिज्य शाखेच्या प्रा. लीना चिखले, तसेच अक्सा सुर्वे, प्रा. रोहित कांबळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. एम. के केळकर यांनी केले व आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी सुप्रिया काडगे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 09/Sep/2025