ज्येष्ठ नागरिकांना आमचे नेहमीच मार्गदर्शन मिळेल : आर. आर. पाटील

रत्नागिरी : “काही काही कटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसेल, तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन मिळेल. आपण केव्हाही न घाबरता या प्राधिकरणाच्या कार्यालयात, या असे आवाहन रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर पाटील यांनी केले.

रत्नागिरीतील आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिव आर. आर. पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रारंभी आश्रय संघटनेचे संस्थापक सुहेल मुकादम यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू सांगितला.

यावेळी अॅड. वायकुळ यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध सेवांची माहिती दिली. यावेळी संस्थापक सुहेल मुकादम, अध्यक्ष अनिल नागवेकर, कार्याध्यक्ष सिराज खान, सरचिटणीस अहमद मालवणकर, सल्लागार शकील गवाणकर आणि शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध विषयांवरील अडचणी मांडल्या. याबाबत आर. आर पाटील यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवून समाधान केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 09/Sep/2025