Sangameshwar : चक्कर येऊन पडलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी : घरी जेवून झाल्यावर बेडवर आराम करताना चक्कर येऊन पडलेल्या प्रौढाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. संतोष गोविंद चव्हाण (वय ५५, रा. निवळी – बावनदी, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.

संतोष चव्हाण यांच्या छातीत दुखत असल्याने ते शनिवारी खासगी डॉक्टरांकडे जाऊन आले होते. मात्र, रविवारी त्यांना चक्कर आली आणि पडले. त्यांना प्रथम खासगी नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासन मयत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 09/Sep/2025

Ratnagiri Khabardar add image