Ratnagiri : १२ सप्टेंबर पासून रंगणार राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

रत्नागिरी : येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १२ व १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय घवाळी यांनी केले आहे.

यावर्षी माध्यमिक गटाची दि. १२ सप्टेंबर रोजी, तर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटाची दि. १३ सप्टेंबर रोजी स्पर्धा होणार आहे. जिल्हास्तरीय माध्यमिक गटासाठी ‘विज्ञान कथाकार-जयंत नारळीकर’, ‘जीएसटी एक जिझिया’, ‘आम्ही तिसऱ्या महायुद्धाच्या क्षितिजावर!’, ‘हिंदी सक्ती, गरज कोणाची?’, ‘समाजभान ‘रत्न’ रतन टाटा’, असे विषय आहेत. तसेच कनिष्ठ महाविद्यालयासाठी अभिजात माय मराठी, भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक पत, इव्हीएम विश्वासार्हता आणि ४५ दिवस, खासगी क्लासेसचे आक्रमण, दानशूर भागोजी कीर असे विषय आहेत.

वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी (राज्यस्तरीय) ‘बहुआयामी साहित्यिक-जयवंत दळवी’, ‘ट्रम्पशाही आणि जागतिक अर्थकारण’, ‘आणीबाणी इतिहास आणि वर्तमान!’, ‘अरण्यऋषी-मारुती चितमपल्ली’, ‘जातीय जनगणनेची अपरिहार्यता’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. सचिन टेकाळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 09/Sep/2025