देवरुख : गेले दोन महिने वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या बोअरवेलचा पंप बंद पडला होता. ही बाब माजी सरपंच अनिषा नागवेकर यांच्या लक्षात येताच स्वतंत्र पाण्याची टाकी देऊन स्वतंत्र पाणी वाहिनी टाकून पाणी समस्या दूर केली आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी दाद मागूनही समस्याही आजतागायत दुर्लक्षितच राहिली आहे. अखेरीस प्रशासनाला कंटाळून स्टाफ नर्स श्रीमती सुर्वे यांनी ड्युटीवर हजर होण्यापूर्वी ही समस्या माजी सरपंच अनिषा नागवेकर यांना सांगितली.
दरम्यान, केवळ सहा तासांतच अनिषा नागवेकर यांनी त्यांची १ हजार लिटर पाण्याची टाकी देऊन आणि आपल्या स्वतंत्र पाईपलाईनवरून कनेक्शन देऊन पुढील काही महिने तरी पाण्याची समस्या सोडविली आहे. यासाठी त्यांचे पती अॅड. अरूण नागवेकर व अमर मोहिते यांनीही सहकार्य केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 10/Sep/2025













