रत्नागिरी : परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास पाण्यात जाण्याची शक्यता; शेतकरी चिंतेत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे पिकलेले भात जमीनदोस्त झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. एकीकडे मुसळधार कोसळत असलेला पाऊस आणि त्याच्यासोबत रात्री-अपरात्री वीज आणि चमकण्यासह ढगांचा गडगडाट होत आहे. गेले दोन दिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी भात पिकासाठी मशागत, भात पेरणी, नांगरणी, लावणी, खत व कीटकनाशके वापरून केलेली शेती डोळ्यासमोरच पाण्यात गेली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. हजारो रुपये खर्च करुन व मेहनत करुन हातातोंडाशी आलेले भातपीक जमीनदोस्त होत आहे. काही ठिकाणी जमीनदोस्त झालेल्या भाताला अंकुर फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला व संबंधित यंत्रणेला पंचनामे करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत हजारो रुपये खर्च करुन व मेहनत आहे.

कृषीतील रिक्त पदांमुळे पंचनामे करताना अडचणी
या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासनाने तातडीने पंचनामा करावा. तसेच आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. मात्र, कृषी विभागाकडे असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पंचनामे करताना अडचणी येत आहेत.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 21/Oct/2024