गुहागर : गुहागर बसस्थानक ते गुहागर नाका या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक दिवस या खड्यांचा त्रास प्रवासी व ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. अखेर संतप्त प्रवासी व ग्रामस्थांनी रस्त्यातील खड्यातच वृक्षारोपण केले.
या खड्ड्यांमुळे अनेकवेळा अपघातही झाले आहेत. येथील ग्रामस्थांनी रस्त्यामध्ये पडलेल्या खड्यांमध्ये वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला. एसटी स्टैंड ते गुहागर नाका या रस्त्यात खड्डे पडले आहेत. गुहागर बाजारपेठ ते पोलिस स्टेशन व वरचापाट बागेपर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. खड्डे बुजवण्यासाठी जांभा दगडाचा वापर केला जातो. पाऊस पडल्यावर पुन्हा खड्डे व ऊन पडल्यावर धुळीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 10/Sep/2025













