सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील धामापूरतर्फे संगमेश्वर गोवळवाडी येथे सभागृहाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. धामापूरतर्फे संगमेश्वर गोवळवाडीच्या ग्रामस्थांनी आमदार निकम यांच्याकडे सामाजिक सभागृहाची मागणी केली होती. या मागणीनुसार आमदार निकम यांनी कोयना भूकंप योजनेतून या सभागृहाला निधी मंजूर केला.
समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. सभागृहाच्या निर्मितीमुळे स्थानिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळेल तसेच आपल्या परिसरात शालेय आणि सामूहिक उपक्रमांसाठी एक उत्तम व्यासपीठ निर्माण होईल, असे विचार आमदार निकम यांनी व्यक्त केले.
यावेळी पांडुरंग माळी, शेखर उकार्डे, नाना कांगणे, जाकीर शेखासन, गणपत चव्हाण, अक्षय चव्हाण, सुशील भायजे, दत्ताराम भायजे, शांताराम भायजे, अण्णा शिगवण, गणपत भायजे, सुभाष शिगवण, काशिराम शिगवण, राजाराम भायजे, सुरेश भायजे, रामचंद्र बेंडके, दीपक शिगवण, सुयोग भायजे, सुरेश रामाणे, लहू सुर्वे, दत्ताराम मेस्त्री, महादेव पडवे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 10/Sep/2025













