रत्नागिरी : रत्नागिरी विभागातील कित्येक एसटी बसेस वयोमर्यादामुळे जुन्या झालेल्या एसटी बसेस डिसेंबर २०२४ साली भंगारात काढण्यात आल्या होत्या, भंगार विक्रीतून रत्नागिरी विभागाला तब्बल ३ कोटींचा महसूल मिळाला आहे. रत्नागिरी आगारासह विविध आगारातील बसेस जुन्या, खिळखिळ्या झाल्या आहेत. जुन्या वयोमर्यादा झालेल्या गाड्या डोकेदुखी ठरल्या आहेत. २०२५-२६ या वर्षी अद्याप लिलाव प्रक्रिया झाली नसून लवकरच लिलाव होवून रत्नागिरी विभागातील बसेस भंगारात जाणार आहेत.
राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळाच्या राज्यभरातील विविध आगारातील जुन्या व वयोमर्यादा झाल्यामुळे तशाच उभ्या आहेत. दरम्यान, डिसेंबर २०२४ साली रत्नागिरी विभागाने जुन्या बसेस लिलावात काढल्या होत्या. यातून तब्बल ३ कोटीचा महसूल रत्नागिरी एसटी विभागाला मिळालेला आहे. पावसाळ्यात कित्येक एसटी बसेसमध्ये छत गळती, छपरात पाणी साचणे, खिडक्या पडणे, खुर्चा खराब झाल्या आहेत, रत्नागिरी विभागातील सर्वच आगारात बहुतांश एसटी बसेस जुन्या झाल्या आहेत. वयोमर्यादा पूर्ण झाली असून येत्या काही महिन्यात कित्येक बसेस भंगारात निघणार आहेत. रत्नागिरी आगारासह विविध आगारात ५० हून अधिक नवीन स्मार्ट एसटी बसेस दाखल झाल्यामुळे प्रवाशांसाठी ही चांगली बाब आहे.
सिटी बसेस, जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेर, महाकार्गो सेवेतील बसेस अशा कित्येक जुन्या बसेस आता भंगारात जाणार आहेत. राज्यभरात दरवर्षी २ हजारहून अधिक एसटी बसेस भंगारात निघत असतात. येत्या दोन ते तीन वर्षात राज्यभरातील सुमारे ५ हजार बसेस भंगारात निघणार आहेत. प्रत्येक बसमागे २ ते अडीच लाखांचा महसूल एसटी महामंडळाला मिळणार आहे.
पावसाळ्यात कित्येक जुन्या गाड्यामध्ये खिडक्यांच्या फ्रेम गळून पडल्या, काही बसच्या छतामधून पाणी गळते. कित्येक प्रवाशांचे कपडेही खराब झाले आहेत. त्यामुळे त्याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. काही नवीन बसेस रत्नागिरी विभागात आल्या आहेत. तसेच आणखी ई-बसेस, सीएनजी बसेसही रत्नागिरीत येणार आहेत.
जुन्या एसटी बसेसच्या भंगार विक्रीतून डिसेंबर २०२४ साली ३ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. नवीन वर्षात जुन्या बसेसचा अद्याप लिलाव झाला नसून लवकरच जाहिरात निघणार आहे. लिलाव झाल्यानंतर एसटी बसेस भंगारात जातील त्यातून एसटीला महसूल मिळेल-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 10/Sep/2025














