सौरभ मलुष्टे स्वखर्चाने करतायत डास निर्मूलन, रत्नागिरीकरांकडून कौतुकाचा वर्षाव

रत्नागिरी : शहरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यू आणि तापासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मध्ये घरोघरी जाऊन मोफत डास निर्मूलन फवारणी सुरू केली आहे.

नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सौरभ मलुष्टे यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. पावसाळ्यात डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी तातडीने पाऊले उचलली आहेत. रत्नागिरी नगर परिषदेकडून शहरात डास निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू आहेतच, मात्र त्यांच्या या प्रयत्नांना साथ देत सौरभ मलुष्टे यांनी स्वतःची यंत्रणा उभी करून प्रभागातील नागरिकांना दिलासा दिला आहे.

स्वतःच्या यंत्रणेद्वारे कामाला गती

सौरभ मलुष्टे यांनी या कामासाठी एक स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून, त्यांचे पथक प्रभाग ५ आणि ६ मधील प्रत्येक भागात जाऊन फवारणी करत आहे. विशेष म्हणजे, नागरिकांकडून मागणी येताच पथक तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून फवारणी पूर्ण करत आहे. दररोज होणाऱ्या कामाचा आढावा स्वतः सौरभ मलुष्टे घेत असून, एकही घर किंवा परिसर फवारणीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्यांच्या या उपक्रमाला शिवसेनेतील वरिष्ठ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची देखील मोलाची साथ मिळत आहे.

नागरिकांकडून कौतुकाची थाप

आपल्या प्रभागातील नागरिकांची समस्या ओळखून तातडीने उपाययोजना करणाऱ्या सौरभ मलुष्टे यांच्या या निर्णयाचे आणि कामाचे स्थानिक नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे. ऐन आजारपणाच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उचललेल्या या पावलामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

समस्या असल्यास थेट संपर्क साधा

प्रभाग ५ आणि ६ मधील नागरिकांना डास फवारणी किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्यांनी 7972130853 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सौरभ मलुष्टे यांच्यावतीने करण्यात आले आहे.