Sangameshwar : श्वास घेण्यास त्रास; ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू

देवरुख : श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारांसाठी दाखल केलेल्या संगमेश्वरातील पूर-पाटगाव येथील ५४ वर्षीय महिलेचा सोमवारी आकस्मिक मृत्यू झाला. प्रतिभा पांडुरंग वेले असे त्यांचे नाव आहे. याबाबत त्यांच्या मुलाने देवरुख पोलिस स्थानकात माहिती दिली.

त्यानुसार प्रतिभा वेले यांना लघवी व शौचाला होत नव्हते. त्यांना मुलाने पेज पिण्यासाठी दिली. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यामुळे प्रथम देवरुख येथील सरकारी रुग्णालयात नेले. तिथून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 10/Sep/2025