Chiplun : एमआयडीसीने नुकसानग्रस्त दुकानदारांना तातडीने मदत द्यावी – शौकत मुकादम

चिपळूण : शहरानजिक फरशी येथे सोमवारी रात्री अचानक एमआयडीसीची पाईपलाईन फुटली, यामुळे आजूबाजूच्या दुकानदाराचे फार मोठे नुकसान झाले आहे. या दुकानदारांना एमआयडीसीने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत माजी सभापती शौकत मुकादम यांनी भेट दिली व दुकानदारांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई एमआयडीसीने ताबडतोब करावी. पंचनामे करून त्यांना भरपाई द्यावी, अशा सूचना मुकादम यांनी अधिकाऱ्यांना केली व भविष्यात पाईपलाईन फुटणार नाही याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी असे ठणकावून सांगितले. वेळोवेळी पाईपलाईन फुटणे हे योग्य नाही याची देखील काळजी तुम्ही घेतली पाहिजे असेही सुनावले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 10/Sep/2025