Ratnagiri : जनसुरक्षा विधेयकातील अटींच्या विरोधात ‘मविआ’कडून आंदोलन

रत्नागिरी : जनसुरक्षा विधेयक आणण्याचा डाव टाकल्याचा आक्षेप घेत त्याचा निषेध करण्यासाठी आणि कायद्यातील बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा हा हेतू चांगला नाही. हा डाव उधळून टाकणे आवश्यक असून या कायद्यातील जाचक अटी काढून टाकाव्यात, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा उबाठाचे उपनेते बाळ माने यांनी केले.

बुधवारी महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महायुतीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात निवेदनही देण्यात आले. तत्पूर्वी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व मोदी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी बाळ माने यांच्यासह तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बशीर मुर्तुझा, माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, नौसीन काझी, तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, शहराध्यक्ष अश्फाक काद्री, उबाठाचे संजय पुनसकर उबाठाचे माजी नगरसेवक सलील डाफळे, रशिदा गोदड संजय पुनस्कर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.?

जाचक अटी काढा
जनसुरक्षा विधेयक आणण्याचा डाव म्हणजे डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेची चौकट मोडण्याचा प्रयत्न सुरू असून या कायद्यातील जाचक अटी काढून टाकाव्यात, अशी मागणीही यावेळी आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 11-09-2025