खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भरणे गोवळवाडी येथील कोल्हापूर गॅरेजसमोर बुधवारी दि. १० रोजी सायंकाळी ४.३० वाजता मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. कळंबणी येथून खेडच्या दिशेने येत असलेल्या मोटारसायकलवरील (एम एच ०३ बीएस ३७४२) चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल घसरली. यात सुमित चंद्रकांत मोरे (वय ३३, रा. शिवतर) आणि कार्तिक अरुण मोरे (वय १९, रा. शिवतर) हे दोघे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्था, नानिजधाम यांच्या वतीने २४ तास उपलब्ध असणारी मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी जखमींना त्वरित उपजिल्हा रुग्णालय, कळंबनी येथे दाखल करून प्राथमिक उपचार करून दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 11/Sep/2025













