Ratnagiri : रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर उक्षी ते भोकेदरम्यान ट्रॅकवर लोहमार्ग पोलिसांना जखमी अवस्थेत अनोळखी तरुण आढळळा. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी (ता. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोके रेल्वेस्टेशन येथील स्टेशनमास्तर यांनी रत्नागिरी येथील ठाणे अंमलदार यांना फोनद्वारे उक्षी ते भोके रेल्वेस्टेशनदरम्यान बोगद्यामध्ये एक अनोळखी तरुण जखमी अवस्थेत असल्याचे सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता जखमी अवस्थेत अनोळखी तरुण आढळला (नाव-गाव माहीत नाही) अंदाजे वय ३५ आहे. हा कोणत्यातरी रेल्वेमधून पडून त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूपासून डोळ्यापर्यंत दुखापत झालेली होती. तत्काळ त्याला रत्नागिरी रेल्वेस्टेशनला आणून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 11/Sep/2025