लांजा : पंचायत समितीच्या वतीने आयोजित महाआवास अभियान पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यात विविध ग्रामपंचायतींनी राबवलेल्या उपक्रमांचा गौरव करण्यात आला. तालुकास्तरीय पुरस्कारामध्ये राज्य पुरस्कृत आवास योजनेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून भांबेडला प्रथम, रुण ग्रामपंचायतीला द्वितीय आणि गवाणे ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक मिळाला.
सर्वोत्कृष्ट घरकुलमध्ये शारदा बापरेकर (साटवली),मनोहर गुरव (पन्हळे), संतोष कोटकर (सालपे) यांचा सन्मान करण्यात आला. प्रधानमंत्री आवासमध्ये भांबेड आणि झापडे ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांक कुर्णे ग्रामपंचायत, तृतीय क्रमांक वाघणगावला मिळाला. वैयक्तिकमध्ये उषा गुरव (प्रभानवल्ली), वसंत गाडे (आसगे), प्रकाश जाधव (कुरंचुब) यांचा सन्मान करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 11/Sep/2025













