Dapoli : केळशी मोहल्ल्यात दोन गटांत हाणामारी; ५० संशयितांविरोधात गुन्हा

दापोली : दापोली तालुक्यातील केळशी मोहल्ला येथे सार्वजनिक इमारतीचे कुलूप तोडल्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना काल (ता. ९) रात्री घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी दापोली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांतील ५० संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

दापोली मिळालेल्या पोलिसांकडून माहितीनुसार, सार्वजनिक इमारतीचे कुलूप तोडल्याच्या रागातून झालेल्या वादात प्रथम जाहिद अब्दुल रज्जाक यांनी तक्रार दिली. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, उंबरशेत नबी मोहल्ला येथील ग्रामस्थ जाहिद अब्दुल रज्जाक, आतिका जाहिद डायली व इतर काही जणांवर केळशी किनारा मोहल्ला येथील १५ संशयितांनी शिवीगाळ करून मारहाण केली.

दरम्यान, जाकीर इस्माईल होडेकर यांनीही तक्रार नोंदवली असून, त्यांच्या तक्रारीत आपल्या गटातील लोकांवर शिवीगाळ करून हाणामारी झाल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या तक्रारीवरून ३५ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटांतील मिळून सुमारे ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक एम. पाटील करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 11/Sep/2025