Khed : फुरूस-पोयनार रस्त्याला भगदाड

खेड : खेड तालुक्यातील फुरूस-पोयनार रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. खेड-दापोली मुख्य मार्गालगत असलेल्या फुरूस गावातून पोयनारकडे जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या भगदाडाखाली मोठ्या स्वरूपाचे भुयार देखील तयार झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोयनार गावाला खासदार सुनील तटकरे यांची सासरवाडी म्हणून देखील एक वेगळी ओळख आहे. नुकत्याच बांधण्यात आलेल्या या रस्त्याची झालेली दुर्दशा हा कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा प्रकार असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 11/Sep/2025