फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनकडून सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेला मदतीचा हात

रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून सोमेश्वर येथील सोमेश्वर शांतीपिठाच्या विश्वमंगल गोशाळेतील गायी-वासरांसाठी दरमहा चारा व पशुखाद्याची मदत करण्यात येत आहे. याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन नेहमीच त्याच्या पाठीशे जबाबदारीने उभे राहिले आहे. त्यामध्ये पुण्यामधून ६०० पेक्षा जास्त गाईना चारा व निवारा, कोविडच्या काळात ४५० पेक्षा घोडे मालकांना खाद्य स्वरूपात मदत, गुजरात मध्ये मकरसंक्रांतीच्या वेळी पतंगामुळे होणाऱ्या पक्षांच्या अपघातानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे, १२००० पेक्षा जास्त ऑलिव्हरेडले कासव अंडी संवर्धन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

प्राणी कल्याणकारी संस्था पीपल फॉर ऍनिमल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांनी रत्नागिरी येथील सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेला पाठिंबा देण्यासाठी एक करार केला आहे. या अंतर्गत, गोशाळेत असलेल्या ६७ गायींसाठी दरमहा चान्याची व पशु खाद्याची सोय केली जाणार आहे.

या उपक्रमामुळे गोशाळेवरील दैनंदिन चाऱ्याचा ताण कमी होईल तसेच गायींना नियमित पोषण मिळेल, त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल आणि त्या निरोगी राहतील. चांगले पोसलेल्या गायी स्थानिक परिसंस्था व समाजाला सकारात्मक योगदान देतात.

त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी रत्नागिरीतील सोमेश्वर गोशाळेत चाऱ्याचे व पशु खाद्याचे वाटप करण्यात आले. वितरण कार्यक्रमास सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेतून राजेंद्र आयरे, अनुजा पेटकर, विनोद पेटकर, स्नेहल वैशंपायम, राकेश वाघ, तेंडुलकर व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन कडून श्री. रामबाबू सांका, श्री. सत्यव्रत नायक, श्री. नरेश खेर, श्री. अभिषेक साळवी उपस्थित होते.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन समाजोपयोगी कार्यात सदैव पुढाकार घेत असून जीवन पोसणाऱ्या आणि समुदायांना टिकवून ठेवणाऱ्या कार्यासाठी कटिबद्ध आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 11/Sep/2025