Anganwadi Helper : अंगणवाडी मदतनीस पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी १ मार्फत तालुक्यातील टिके ग्रामपंचायतीमधील टिके चाळकेवाडी अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी मदतनीस रिक्त पद भरावयाचे आहे. इच्छुक स्त्री स्थानिक उमेदवारांनी २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी १, साईप्रसाद बंगला, एकता मार्ग, मारुती मंदिर येथे अर्ज करावेत.

आवश्यक माहितीसाठी सुटीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ या वेळेत संपर्क साधावा. नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्वीकारले जातील. अपूर्ण व खोडाखोड केलेल्या अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी १ यांनी केले आहे. शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण असून, गुणपत्रक आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे आहे. तथापि, विधवा उमेदवारांसाठी कमाल ४० अशी राहील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:47 PM 11/Sep/2025