चिपळूण : शहरालगतच्या कळंबस्ते येथे ऐन गणेशोत्सवात ३ लाखांचे दागिने चोरून घरफोडी करणाऱ्याला चिपळूण पोलिसांनी पकडले आहे. मनिष अमित नागवेकर (२३, रा. कळंबस्ते) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याने याआधी देखील काही किरकोळ चोऱ्या केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय होता. अखेर तो खरा ठरला असून पोलिसांनी ते दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलिसांत कळंबस्ते येथील ज्ञानेश्वर अपार्टमेंटमध्ये राहाणारे अमर टोमके यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या घरात कोणीही नसताना अज्ञाताने प्रवेश करून त्यांचे ३ लाख रूपये किंमतीचे दागिने लांबविले होते. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली.
या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली आणि चिपळूण पोलिस ठाण्यातील गुन्हा अन्वेषण पथकाने चोरट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, गुन्हे अन्वेषण पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक ओम आघाव, हे. कॉ. मांडके, पोलिस नाईक रोशन पवार, हे. कॉ. अर्चना बोले आदींनी ही कामगिरी केली आहे. उद्या या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:12 PM 11/Sep/2025













