रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागामध्ये शिकाऊ उमेदवार भरतीसाठी विविध कार्यशाळा व्यवसायातंर्गत ४३४ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.
www.https://apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभाग कार्यालयात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज व राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी या कार्यालयाकडे उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन नमुना अर्ज असे दोन्ही अर्ज विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा राहील. ही भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, भरावयाच्या जागांमध्ये वाढ किंवा घट करणे इत्यादीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विभाग नियंत्रक, राज्य परिवहन रत्नागिरी विभाग यांना राहणार आहे.
शिकाऊ उमेदवारी भरतीकरीता विविध पदे
यांत्रिक डिझेल ११०, यांत्रिक मोटारगाडी ११०, बीजतंत्री ६०, पत्राकारागीर ४४, सांधाता २५, कातारी १०, यंत्र कारागीर १०, रेफिजरेशन अँड एयर कडीशनिंग ५, साठा जोडारी ४४, सुतार ४, रंगारी १०, शिवणकाम २.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 12/Sep/2025













