Ratnagiri : राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना जिल्हा निवड समितीवर अमोल रेडीज यांची निवड

लांजा : राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना रत्नागिरी जिल्हा निवड समितीवर लांजा तालुक्यातील प्रसिद्ध सिने-नाट्य, अभिननेते दिग्दर्शक अमोल रेडीज यांची निवड करण्यात आली आहे. अमोल रेडीज यांची निवड लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या सहकार्याने व पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशाने करण्यात आली. लांजा तालुक्यातील ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून अमोल रेडीज यांची निवड समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यामुळे लांजा तालुक्यासह जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे.

अमोल रेडीज हे उत्तम रंगकर्मी, लेखक, कवी, वक्ते आहेत. त्यांनी एकांकिका, वावसायिक व राज्यनाट्य स्पर्धा यासह मराठी चित्रपट, शॉर्टफिल्म, वेबसिरीज अशा माध्यमातून दर्जेदार अभिनय त्यांनी साकारला आहे. यांसह विविध संस्था व शासनाच्या विविध पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. जिल्ह्याच्या कलावंतासाठी त्यांना काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.. रेडीज यांची निवड त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा सन्मान असून साहित्य व कलावंतांच्या हितासाठी उपयुक्त ठरेल असे बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 12/Sep/2025