खेड : पाटील महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे यांच्या दबावाखाली काढलेल्या शासकीय निर्णयामुळे समस्त ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला असून, याच्या निषेधार्थ ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर १५ सप्टेंबर रोजी खेड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये तालुक्यातील हजारो ओबीसी बांधव सहभागी होणार असून, या मोर्चातून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. नुकत्याच झालेल्या बैठकीत या मोर्चाचे नियोजन करण्यात आले.
या बैठकीस कुणबी समाज ग्रामीण अध्यक्ष कृष्णा आग्रे, ग्रामीण युवक अध्यक्ष सूरज जोगळे, सचिन गोवळकर, संघ कार्यकारिणी सदस्य नवनीत पिंपरे, श्रीकांत कदम, माजी अध्यक्ष अमित कदम, सुजित शिंदे, सचिन बाईत, किशोर आदावडे, मंदार शिर्के, आनंद लाले, संतोष गोमले, बाळू सनगरे आदी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
ओबीसी समाजावर होत अन्यायाविरोधात असलेल्या एकदिलाने आवाज उठवण्यासाठी सर्व समाजबांधवांनी या मोर्चामध्ये मोढ्या संख्येने सहभागी व्हावे आणि मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 12/Sep/2025














