वैभववाडी : तज्ज्ञांच्या पथकाने धोकादायक ठरविलेल्या करूळ घाटातील सहापैकी पाच ठिकाणच्या धोकादायक दरडी हटविण्यात आल्या असून, एका ठिकाणची दरड हटविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आज (ता.१२) दुपारपर्यंत काम पूर्ण होणार असून, शनिवार (ता.१३) पासून करूळ घाटमार्गे वाहतूक सुरू होईल, अशी शक्यता आहे.
करूळ घाटात चार सप्टेंबरला ‘यू’ आकाराच्या वळणावर मोठी दरड कोसळली. महाकाय दगड रस्त्यावर आल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली; परंतु, प्रशासनाने घाटरस्त्यांची पाहणी केल्यानंतर घाटमार्गावर कोणत्याही क्षणी कोसळतील, अशी काही ठिकाणे निदर्शनास आली. धोकादायक स्थितीतील दरडी पाडण्याचे काम रविवार (ता. ७) पासून सुरू झाले. परशुराम घाटात जोखमीचे काम करणारे दहा ते पंधरा कामगार हे काम करीत आहेत. सहापैकी पाच ठिकाणच्या दरडी हटविण्यात आल्या आहेत. अजूनही एका ठिकाणचे काम (ता.१२) दुपारपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 12/Sep/2025














