Ratnagiri, BJP : भाजपा दक्षिण रत्नागिरीची ९० जणांची कार्यकारिणी जाहीर

रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरी भाजपाची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेने घोषित केली. अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना भविष्यात पदाधिकारी करण्यासाठी काही जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची फेरनिवड झाली. आता विस्तारित जंबो कार्यकारिणी श्री. सावंत यांनी जाहीर केली आहे.

नवी कार्यकारिणीतील पद व नाव असे उपाध्यक्ष- रवींद्र नागरेकर, संदीप नाचणकर, परिमल भोसले, सौ. संगीता जाधव, संजय यादव, प्रशांत डिंगणकर, अभिजित गुरव, सरचिटणीस- अमित केतकर, सौ. प्रणाली सावर्डेकर, चंद्रकांत मांडवकर, चिटणीस- राजन फाळके, अशोक वाडेकर, राजू भाटलेकर, हेमंत शेट्ये, सौ. स्नेहा मेस्त्री, सौ. संगीता कवितके, रवींद्रनाथ अवसरे, कोषाध्यक्ष मंदार सरपोतदार. याशिवाय ६६ जणांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सौ. वर्षा ढेकणे यांची फेरनियुक्ती केली आली आहे. अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलेश भुरवणे, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. ऐश्वर्या जठार, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल सावर्डेकर, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप भिसे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश गुरव आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांची नियुक्ती केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 12-09-2025