लांजा : तालुक्यातील पालू व माचाळ गावामध्ये बीएसएनएलची सेवा मिळण्यासाठी टॉवर बांधून दोन वर्षांहून अधिक कालावधी लोटला. मात्र बीएसएनएल नेटवर्क सेवा सुरू करण्यास संबधित यंत्रणेला मुहूर्त मिळेना झाला आहे. त्यामुळे पालू येथील बीएसएनएलचा टॉवर केवळ शोभेची बाहुली बनला आहे, अशा प्रतिक्रिया आता पालू परिसरातून उमटू लागल्या आहेत.
तालुक्यातील पालू, माचाळ, परिसर सह्याद्री खोऱ्यांमध्ये दुर्गम भागात वसलेला आहे. येथील नागरिकांना तालुका अथवा अन्य ठिकाणी संपर्क साधण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही आहे. मोबाई आहेत मात्र नेटवर्क नाही त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. नागरिकांच्या मागणीनुसार डिसेंबर २०२३ मध्ये पालू गावात बेंडलवाडी येथे टॉवर बांधण्यात आला. मात्र सद्या हा टॉवर शोभेची बाहुली बनला आहे. टॉवर बांधून तीन वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी येथील जनतेला नेटवर्क सुविधा देण्यात अद्यापही बीएसएनएलला मुहूर्त मिळेना झाला आहे. इडछडच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटून बंदावस्थेत असणारा टॉवर सुरू करा अशी मागणी करण्यात आली. मात्र नागरीकांच्या मागणीकडे इङछङ ने कानाडोळा करत कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. टॉवर बांधून काम पूर्ण होऊनही बंद ठेवायचा होता तर टॉवर का बांधला? असा संतप्त सवाल पालू ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने केला आहे.
पालू येथे बांधलेला टॉवर लवकर सुरू करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पालू ग्रामस्थांनी दिला आहे. लांजा तालुक्यात बीएसएनएल लवकरच नवीन तंत्रज्ञानासह विकसित केले जाणार आहे असे संबधित यंत्रणेकडून सांगण्यात येते. मात्र दीड दोन वर्षांपासून सुरू असलेले काहीठिकाणचे काम पूर्णत्वाला अद्यापही गेलेलं नाही. काम पूर्ण झाल्यास ग्राहकांना नेटवर्क सुरळीत मिळेल अशी अपेक्षा आहे. लांजा तालुक्यात २० टॉवर कार्यरत असून यामध्ये अजून १० नवीन टॉवरची भर पडली आहे. माचाळ, चिंचुर्टी, पालू, हर्दखळे, वनगुळे, बापरे, गोविळ, वाडीलिंबू या ठिकाणी बीएसएनएलचे ४ नेटवर्कसाठी टॉवर नव्याने उभारण्याचे काम प्रगती पथावर आहे. माचाळ, पालू याठिकाणी दोन वर्षभरापूर्वी बीएसएनएल टॉवर बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पालू, चिंचुर्टी, माचाळ, हुंबरवणे या सह्याद्री खोऱ्यांमधील अतिदुर्गम भागात आता बीएसएनएलची रिंग लवकरच वाजणार आहे.
मात्र येथील टॉवर अद्याप सुरू झाले नसल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. तालुक्यात बीएसएनएलचे नवीन दहा टॉवर मंजूर होऊन त्यांचे काम गतीने सुरु आहे. यामध्ये तालुक्यात सह्याद्रीच्या माथ्यावर दुर्गम ठिकाणी वसलेल्या माचाळ या पर्यटनच्या गावी नेटवर्क नसल्यामुळे प्रशासन, नागरिकांशी संपर्क साधणे कठीण होत होते.
लांजा तालुक्यात इङछङ चे काम सुरू आहे मात्र पाऊस जास्त असल्याने काही दिवस कामात अडथळे येत असल्याने काम थांबले होते. काही ठिकाणी काम झाले आहे तर काही ठिकाणी काम सुरू आहे. पालू, माचाळ येथील टॉवरच्या पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. तांत्रिक अडचणी येत असल्याने टॉवर सुरू होत नाही आहेत. मोबाईल टीम प्रयत्न करत असून वारंवार टेस्टिंगचे काम सुरू आहे. टेस्टिंग पूर्णत्वाला गेल्यास टॉवरची सेवा आठवडाभरात सुरू होईल-आरती जोशी, अधिकारी, बीएसएनएल, लांजा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 12/Sep/2025














