मंडणगड : महाराष्ट्र शासनाने मांडलेले जनसुरक्षा विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी शिवसेनेने (ठाकरे गट) तहसीलदार अक्षय ढाकणे यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
विद्यमान सरकारने सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करून हुकूमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी हे विधेयक आणले असल्याचे नमूद केले आहे. सरकार या कायद्याचा उपयोग विरोधक, डाव्या संघटना आणि डाव्या संघटनांशी संबंधित लोकांना तसेच सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिक व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही करण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ हे घटनाविरोधी व लोकशाहीस बाधक विधेयक असून, ते तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. निवेदनावर तालुकाप्रमुख संतोष गोवळे, तालुका संघटक जितेंद्र दवंडे, उपतालुकाप्रमुख रघुनाथ पोस्टुरे, संदीप वाघे, संजय सापटे, सुषमा रापणे आदींच्या सह्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 12/Sep/2025














