चिपळूण : कोकणातील संगीतप्रेमी रसिकांसाठी एक अप्रतिम पर्वणी घेऊन येत आहे. संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे २७ सप्टेंबरला चिपळुणात आणि २८ ला रत्नागिरीत सुप्रसिद्ध गायक-कलाकार बालगंधर्व यांच्या अजरामर नाट्यसंगीताचा सुरेल आविष्कार सादर करण्यात येणार आहे.
ख्यातनाम गायिका विदुषी मंजूषा पाटील या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण करणार असून, तब्बल दहा वर्षांनंतर त्या पुन्हा नाट्यसंगीतावर आधारित कार्यक्रम रसिकांसमोर सादर करत आहेत. हा सुरेल सोहळा चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रात्री ९.३० वाजता, २८ ला रत्नागिरी येथील जयेश मंगल पार्क येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. कार्यक्रमाला हर्षल काटदरे, प्रसाद जोशी, प्रथमेश तारळकर, सुश्रुत चितळे आणि प्रमोद जांभेकर अशी नामांकित संगीतकारांची साथ लाभणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते व अभ्यासक राहुल सोलापूरकर कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 12/Sep/2025














