Aarvali service Road : आरवलीत सेवारस्त्याचे काम रखडलेलेच

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली बाजारपेठ परिसरात दुसऱ्या बाजूच्या सेवारस्त्याचे काम अपूर्णच ठेवण्यात आल्याने प्रवाशांचा जीव महामार्गाच्या या कारभाराविरोधात प्रवासी, वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

रत्नागिरी-चिपळूण दिशेचा सेवारस्ता बंद असल्याने वाहने थेट उड्डाणपुलावरून धावतात. यामुळे प्रवाशांना नियमित थांब्यावर न उतरता लांबच्या तात्पुरत्या थांब्यावर उतरावे लागते. सामानाची पिशवी उचलून, लहान मुले सांभाळत बाजारात यावे लागत असल्याने महिलांना कसरत करावी लागते. तातडीने हे अपूर्ण काम पूर्ण करून सेवारस्ता प्रवाशांसाठी खुला करावा अन्यथा तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 12/Sep/2025

Mahrashi karve ANM