रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक आणि मंडळ रत्नागिरी कीर्तनकार मंडळाच्यावतीने पुण्यस्मरण कीर्तन महोत्सव येत्या १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान रंगणार आहे. यामध्ये कीर्तनकार शरदबुवा घाग (नृसिंहवाडी) यांचे कीर्तन दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ल. वि. केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होईल.
त्यांना ऑर्गनसाथ चैतन्य पटवर्धन व हेमंत देशमुख आणि तबलासाथ केदार लिंगायत, पखवाज कैलास दामले करणार आहेत. कीर्तनप्रेमींनी या कीर्तनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन चित्पावन ब्राह्मण मंडळ व कीर्तनकार मंडळाने केले आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 12/Sep/2025














