Dapoli : दापोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक यांत्रिक डिझेल पदासाठी 23 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

रत्नागिरी, दि.12 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दापोली येथे तात्पुरत्या स्वरूपात शिल्प निदेशक यांत्रिक डिझेल या पदासाठी उमेदवारांची निवड करावयाची आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव प्रमाणे आपले अर्ज दि. 23 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दापोली, मु. पो. जालगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, ता. दापोली, येथे प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. बी. गवई यांनी केले आहे.

पदाचे नाव शिल्प निदेशक यांत्रिक डिझेल असे असून 1 पद भरावयाचे आहे. उमेदवाराची वय मर्यादा 21 ते 38 वर्षे आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार डिग्री इन ॲटोमोबाईल/मेकॅनिकल किंवा डिप्लोमा इन ॲटोमोबाईल/मेकॅनिकल व एक वर्षाचा अनुभव किंवा आयटीआय, एनसीव्हीटी (यांत्रिकी मोटारगाडी/यांत्रिकी डिझेल) व दोन वर्षाचा अनुभव

मानधन : घड्याळी तासिकेनुसार सैद्धांतिकासाठी प्रति तास रु. 250/- तर प्रात्यक्षिकासाठी प्रति तास रु. 125/- मानधन दिले जाईल.

अटी व शर्ती :नियुक्तीचा कालावधी 11 महिने राहील व त्याबाबतचे बंधपत्र देणे अनिवार्य राहील. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी असेल. कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याविषयी तरतूद नाही. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. आपली सेवा असमाधानकारक असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्त करण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 12/Sep/2025