Sangameshwar : संगमेश्वर बसस्थानकात हायमास्ट दिवे

संगमेश्वर : संगमेश्वर बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले असून, स्थानक परिसरात हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. या आधुनिक प्रकाशयोजनेमुळे बसस्थानकाबाहेरील मुख्य मार्ग रात्रीच्यावेळीही उजळून निघाला आहे. बसस्थानक परिसरातील सुरक्षितता आणि वाहतूक सुविधा लक्षात घेऊन हायमास्ट दिवे लावले आहेत. बसस्थानक परिसरात स्वच्छता, बसथांबे, प्रतिक्षाकक्ष, शौचालये अशा विविध सुविधा विकसित केल्या आहेत.

त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. बसस्थानकाचा कायापालट करण्याचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि प्रकाशमय वातावरण उपलब्ध करून देणे हा होता. येथील हायमास्ट दिवे संपूर्ण परिसर उजळून टाकत असून रात्रीही प्रवाशांना आता कोणतीही अडचण भासत नसून बसस्थानकात थांबणे सुरक्षित वाटत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 12/Sep/2025