Ratnagiri : बसणी तंटामुक्ती अध्यक्षपदी चंदन बसणकर यांची बिनविरोध निवड

रत्नागिरी : शहरानजीकच्या बसणी ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंदन बसणकर यांची सलग चौथ्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या चांगल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ग्रामसभेने एकमताने ही निवड केली. ग्रामसभेला सरपंच समृद्धी मयेकर, उपसरपंच किशोर नेवरेकर, ग्रामपंचायत सदस्य सुमित राणे, बबन शिंदे, मानसी पाष्टे, पोलिसपाटील प्रिया बंदरकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 12/Sep/2025