Lanja : लांजा येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी फूड प्रोसेसिंग प्रशिक्षणाचे आयोजन

लांजा : जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी पुरस्कृत व मिटकॉन आयोजित लांजा येथे सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ४५ दिवस कालावधीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

फूड प्रोसेसिंग हे प्रशिक्षण विनामूल्य असून हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थीस दीड हजार रुपये विद्यावेतन व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षणास पात्र होण्यासाठी उमेदवार हा ७ वी पास, जिल्ह्यातील रहिवाशी, वय १८ ते ४५ वर्षे पूर्ण तसेच सुशिक्षित बेरोजगार व या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ज्यांना यामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, रेशनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो १, आधारकार्ड, बैंक पासबुक झेरॉक्स हे कागदपत्र सत्यप्रत करून अर्जासोबत जोडावे.

प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी १६ सप्टेंबर पर्यंत लाईफ टाईम फर्निचर साईतारा कॉम्प्लेक्स, लांजा शाळा नं. ५ समोर , सचिन माजळकर यांचेशी, ९२२६९६०४८७ या नंबरशी संपर्क साधावयाचा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 12/Sep/2025