Ratnagiri Crime : आईच्या खूनप्रकरणी मुलाला अटक

रत्नागिरी Ratnagiri : रत्नागिरीजवळच्या शांतीनगर परिसरात आईचा खून करणाऱ्या मुलाला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत शशिकांत तेली (वय २५) असे संशयिताचे नाव असून, त्याने गेल्या २६ ऑगस्ट रोजी पहाटे आई पूजा शशिकांत तेली (वय ४५) यांच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला होता.

गुन्हा केल्यानंतर अनिकेतने स्वतःच्या दोन्ही हातांच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे १९ दिवसांच्या उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 13-09-2025