खेड : तालुक्यातील रसाळगड फाटा, तळे गावाजवळ पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. रामचंद्र राजेश पवार यांनी खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी महेश जरग (रा. उंब्रज, ता. पाटण, जि. सातारा) व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी पांढऱ्या बोलेरो गाडीतून येऊन पुरे बुद्रुक (आदिवासीवाडी) येथील मधुकर शंकर निकम (वय २६) याला जबरदस्तीने गाडीत बसवून त्याचे अपहरण केले.
फिर्यादी व आरोपी एकमेकांचे ओळखीचे असून, पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वाद सुरू होता. या वादातूनच हे अपहरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून, पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 13/Sep/2025














