Chiplun : भिले येथे विवाहित तरूणाची आत्महत्या

चिपळूण : तालुक्यातील खाडीपट्टा भागातील भिले येथे एका विवाहीत तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुमित अशोक सुतार (हातखंबकर, वय ३२) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

सुमित सुतार याने आपल्या घरातील खोलीत छताला लटकून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. तो सुतारकाम करून चरितार्थ चालवित होता. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 13/Sep/2025