खेड : दसरा, दीपावली व छठपूजा उत्सवकाळात कोकण मार्गावर जाहीर केलेल्या एलटीटी-तिरूवअनंतपूरम साप्ताहिक विशेष गाडीला खेड येथील थांबा मंजूर झाला आहे.
ही मागणी जल फाउंडेशन कोकण विभागाने केली होती. २५ सप्टेंबरपासून धावणाऱ्या या विशेष गाडीमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एलटीटी-तिरूवअनंतपूरम साप्ताहिक विशेष गाडी २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी धावणार आहे. एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता तिरुअनंतपूरमला परतीच्या प्रवासात पोहोचेल. शनिवारी धावणारी स्पेशल सायंकाळी ४.२० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १ वाजता पोहोचेल. २२ डब्यांची एलएच डब्यांची स्पेशल कोकण मार्गावर पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव आदी स्थानकांत थांबणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 13/Sep/2025














